जुने नाशिक : - प्रभाग 13 मध्ये जुन्या नाशकाला पाणीपुरवठा करणाऱ्या जीपीओ पाण्याच्या टाकीची अतिशय दुरावस्था झाल्याचे चित्र समोर आलय.. पाण्याच्या टाकीजवळ दुर्गंधी तसेच डासांचे साम्राज्य असल्याचं धक्कादायक चित्र उघडकीस आला आहे.. प्रभाग तेराला पाणीपुरवठा होत असलेल्या जीपीओ पाण्याच्या टाकीत पाला-पाचोळा... मेलेले किडे... घाण... आणि प्रचंड दुर्गंधी असल्याच धक्कादायक वास्तव उघड झाला आहे..
धक्कादायक म्हणजे त्याच्या अगदी शेजारी शौचालय आणि साचलेले मलमूत्र देखील आढळून आल्याने आरोग्याची गंभीर समस्या या ठिकाणी उद्भवण्याची शक्यता आहे..
मात्र आता नाशिककरांच्या आरोग्याची जबाबदारी नेमकी कोणाची असा सवाल येथील स्थानिक उपस्थित करत आहेत..
एकीकडे स्वच्छ पाण्याचे दावे आणि दुसरीकडे पाण्याच्या टाकीजवळ अशी भयावह परिस्थिती निर्माण झालीये...


