श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारनिमित्त नाशिकच्या पंचवटीतील प्रसिद्ध कपालेश्वर महादेव मंदिरात मध्यरात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
भगवान शंकराच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिर परिसरात लांबच लांब रांगा लावल्या असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला आहे.
श्रावणी सोमवारनिमित्त महादेवाच्या दर्शनासाठी नाशिकसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
दरम्यान, कपालेश्वर भजनी मंडळाच्या वतीने भजनाला सुरुवात करण्यात आली असून, भजन आणि नामस्मरणामुळे मंदिर परिसरातील भक्तिमय वातावरण अधिकच वाढले आहे.
भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
गर्दीचे नियोजन आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.
श्रावणी सोमवारनिमित्त कपालेश्वर मंदिरात सकाळपासूनच हर हर महादेवच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे.


