नाशिक : नाशिकच्या सिटीलिंक बसमध्ये प्रवाशाचे मंगळसूत्र सापडले असून, चालक आणि वाहकांनी ते प्रामाणिकपणे सिटीलिंकच्या वाहतूक शाखेकडे जमा केले आहे. २९ ऑगस्ट रोजी बस क्रमांक MH 15 GV 7967 मध्ये हे मंगळसूत्र आढळून आले.

बसचे चालक राजू जाधव आणि वाहक सखाराम भोये यांनी मंगळसूत्र स्वतःकडे न ठेवता ते सिटीलिंक प्रशासनाकडे जमा केले. त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे हरवलेल्या वस्तूचा शोध घेणाऱ्या प्रवाशाला ती परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आता संबंधित प्रवाशाने योग्य ओळख आणि आवश्यक पुराव्यासह सिटीलिंक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मंगळसूत्र हरवलेल्या व्यक्तीने खालील क्रमांकांवर संपर्क साधावा.

📞 संपर्क क्रमांक : 8530057222 / 8530067222

मंगळसूत्र कोणत्या प्रवाशाचे आहे, याची ओळख पटवून ते संबंधित व्यक्तीकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

आपलं नाशिक | आपला आवाज