शहरातील एबीबी सर्कलवर गेल्या पंधरा दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. दररोज संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या परिसरात वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक पोलीसही दिसत नसल्याची तक्रार नागरिक आणि वाहनचालकांकडून केली जात आहे. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी योग्य नियोजन आणि पोलिसांची उपस्थिती आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून कायम असलेल्या या समस्येवर वाहतूक प्रशासन काय उपाययोजना करणार, तसेच एबीबी सर्कलवरील कोंडी कमी करण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.