गोदावरीतून हजारो गणेशमूर्ती बाहेर; महापालिकेची स्वच्छता मोहीम सुरू
नाशिकमध्ये गणेश विसर्जनानंतर महापालिकेकडून गोदावरी नदीपात्राच्या स्वच्छतेची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. जेलरोड परिसरात नदीत विसर्जित झालेल्या गणेशमूर्ती बाहेर काढण्याचे काम महापालिका कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांनी नदीपात्रात उतरून हजारो गणेशमूर्ती बाहेर काढल्या आहेत. विसर्जनानंतर दुसऱ्याच दिवशी नदीपात्र स्वच्छ करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली.
बाहेर काढण्यात आलेल्या गणेशमूर्तींचे वडनेर आणि चेहडी येथील विहिरींमध्ये पुनर्विसर्जन करण्यात येत आहे. नदीपात्र स्वच्छ ठेवण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात येत असून, या प्रक्रियेची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
या मोहिमेबाबत भाऊसाहेब बच्छाव यांनी माहिती दिली.


