नाशिक रोड रेल्वे स्थानकावर दुपारी ११.३० ते १२.३० या वेळेत मॉक ड्रिल घेण्यात आली.

संभाव्य बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी हल्ल्याची परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने कशी कारवाई करायची, याचा सराव या मॉक ड्रिलमध्ये करण्यात आला.

या सरावात लोहमार्ग पोलीस, RPF, BDDS, QRT, अग्निशमन दल, ATS आणि वैद्यकीय पथक सहभागी झाले होते.

BDDS पथकासोबत ‘अल्फा’ आणि ‘लकी’ या दोन श्वानांचाही मॉक ड्रिलमध्ये सहभाग होता.

या सरावासाठी १० अधिकारी आणि ५० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

आपत्कालीन परिस्थितीत विविध सुरक्षा यंत्रणांमध्ये जलद आणि प्रभावी समन्वय कसा साधायचा, याचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला.

नाशिक रोड स्थानकावरील या मॉक ड्रिलमुळे संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांची तयारी आणि प्रतिसाद क्षमता तपासण्यात आली.