नाशिक शहरातील सलून सेवांच्या दरात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. कॉस्मेटिक साहित्य, ब्लेड तसेच इतर आवश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सलून चालकांच्या खर्चात वाढ झाली आहे. त्याचबरोबर वीज बिलाचा खर्चही वाढल्याने व्यवसायावर आर्थिक भार पडत असल्याचे सलून चालकांचे म्हणणे आहे.
ठक्कर बाजार परिसरासह नाशिक शहरातील विविध सलूनमध्ये नवीन दर लागू करण्यात आल्याची माहिती सलून चालकांकडून देण्यात आली आहे.
वाढत्या खर्चाचा परिणाम आता थेट ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. व्यवसायाचा वाढता खर्च भागवण्यासाठी दरांमध्ये वाढ करणे आवश्यक असल्याचे सलून चालकांनी सांगितले.


