नाशिकच्या प्रभाग क्रमांक १५ मधील भाभानगर परिसरात शेकडो वर्षे जुन्या विशाल वृक्षाच्या संभाव्य तोडीवरून नागरिक संतप्त झाले आहेत. निकुलेस बिल्डिंगसमोरील हा वृक्ष परिसराची ओळख मानला जात असून, कोणत्याही परिस्थितीत तो तोडू देणार नसल्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे. वाढत्या बांधकामांमुळे शहरातील जुने वृक्ष कमी होत असताना या वृक्षाच्या तोडीची चर्चा सुरू झाल्याने पर्यावरणप्रेमी नागरिक आक्रमक झाले आहेत. प्रशासनाने या वृक्षाची तातडीने पाहणी करून वृक्षतोडीसाठी परवानगी देण्यात आली आहे का, याबाबत स्पष्टता करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विकासाच्या नावाखाली नैसर्गिक वारसा नष्ट करू नये, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. वृक्षतोडीचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे
नाशिक शहर
ब्रेकिंग
विकासाच्या नावाखाली वृक्षतोड नको; भाभानगरमधील वृक्षतोडीला नागरिकांचा तीव्र विरोध
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
नाशिक शहर
नार-पार-गिरणा प्रकल्पातील बाधितांचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
नाशिक शहर
नाशिक रोडच्या मुक्तिधाम परिसरात अतिक्रमण कारवाई; अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन यांना घेराव
नाशिक शहर
नाशिक महापालिकेत ५० कोटींच्या निविदांवर सवाल; स्थायी समितीत प्रशासनाला धारेवर धरलं
नाशिक शहर
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर २५ ऑक्टोबरला मुंबईत ‘GenZ जनआक्रोश’ मोर्चा
नाशिक शहर
समाजकल्याण विभागाच्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह; स्थायी समितीत जोरदार गदारोळ


