पंचवटी परिसरातील पेठ रोडवर रस्त्याची दुरवस्था झाली असून, मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. सप्तरंग सोसायटीच्या मागे आणि लिटिल एंजल स्कूलजवळ रस्त्याची स्थिती खराब झाली आहे.
या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, वारंवार तक्रारी करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देऊन रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


