नाशिक: राजीवनगर ते कलानगर दरम्यान सुरू असलेल्या ड्रेनेज व रस्ता दुरुस्तीच्या कामात सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याने मोठा अपघात घडला आहे. येथे कोणताही धोक्याचा इशारा किंवा बॅरिकेडिंग नसल्याने एका दुचाकीस्वाराची गाडी थेट १२ फूट खोल खड्ड्यात कोसळली.
संबंधित ठिकाणी महापालिका प्रशासन आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. रस्त्यावर खोदकाम करून ठेवले असताना रात्रीच्या वेळी वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. सुरक्षेसाठी साधे धोक्याचे फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या जिवाशी उघडउघड खेळ सुरू असल्याचे चित्र आहे.
या अपघातानंतर परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. "पालिका प्रशासन एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का?" असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.
नाशिक शहर
ब्रेकिंग
राजीव नगरला दुचाकीस्वार १२ फूट खोल खड्ड्यात कोसळला | Apla Nashik
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#NMC Nashik
संबंधित बातम्या
नाशिक शहर
नाशिकमध्ये पक्ष्यांची अनोखी निवडणूक! कावळा की गिधाड? १० नोव्हेंबरपर्यंत मतदानाची संधी
नाशिक शहर
सिंहस्थ ध्वजारोहणापूर्वी रामकुंड परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम; विक्रेत्यांची पर्यायी जागेची मागणी
नाशिक शहर
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून रामकुंड परिसरातील तयारीचा आढावा
नाशिक शहर
कुंभमेळा सोहळ्याचं राज्यपालांना निमंत्रण; गिरीश महाजन यांनी घेतली भेट
नाशिक शहर
नाशिकच्या ऐतिहासिक मंदिरांसाठी ९.२० कोटी मंजूर; रामकाल पथ प्रकल्पाला गती


