नाशिक : महाराष्ट्र सरकारच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात नाशिकमध्ये २२ ऑगस्ट रोजी भव्य महामोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

 

शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. समितीचे अध्यक्ष प्रकाश पगारे यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील ५९ जातींना एकत्र आणत हा महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दिली.

महामोर्चा अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी विविध सामाजिक संघटना, ज्येष्ठ नेते आणि समाजबांधवांशी समन्वय साधला जात असल्याची माहिती समितीचे सरचिटणीस अर्जुन पगारे यांनी दिली.

 

https://youtu.be/oW25os1AJwc?si=CPEDWZshzYVJG4uO

 

बैठकीत विविध समाज संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच मोर्चाच्या यशासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.