नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. नदीकाठच्या परिसरातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असून प्रशासनाकडून धरणांतील पाण्याच्या विसर्गावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून 25,925 क्युसेक, दारणा धरणातून 80 क्युसेक, कादवा धरणातून 3,832 क्युसेक, भाम धरणातून 3,076 क्युसेक आणि पालखेड धरणातून 2,736 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

याशिवाय वाघाड धरणातून 1,997 क्युसेक, वालदेवी धरणातून 1,305 क्युसेक, भावली धरणातून 1,218 क्युसेक, गंगापूर धरणातून 574 क्युसेक आणि करंजव धरणातून 521 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

प्रशासनाकडून नदीकाठच्या भागांवर सातत्याने देखरेख ठेवण्यात येत असून नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे