नाशिक: नाशिक शहरातील रस्त्यांवर पावसानंतर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नाशिकरोडमधील जेलरोड, बिटको चौक, शिवाजी पुतळा, बसस्थानक, देवळाली गाव आणि सौभाग्यनगर परिसरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यांवर खडी साचल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
विशेष म्हणजे खड्डे बुजविण्यासाठी निधीची तरतूद असतानाही अद्याप कंत्राट मंजूर झालेले नाही. नाशिकरोडमधील सहा प्रभागांसाठी प्रत्येकी ७५ लाख रुपयांची वार्षिक तरतूद असूनही दुरुस्तीची कामे रखडली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
https://aplanashik24.tv/crime-news/nashikroad-four-shops-targeted-in-early-morning-theft


