अपचन, पोट फुगणे आणि अतिसाराचा त्रास? आहारात करा ‘हे’ बदल
अपचन, पोट फुगणे, गॅस आणि अतिसाराचा त्रास वारंवार होत असेल, तर त्यामागे आहाराच्या चुकीच्या सवयींसह अनेक कारणे असू शकतात. अशा वेळी आहारात कोणते बदल करणे गरजेचे आहे? कोणते पदार्थ टाळावेत? पोट फुगण्याची सामान्य कारणे कोणती? तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबाबत योग्य माहिती असणे महत्त्वाचे आहे.
अतिसाराच्या काळात शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार कमी होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा परिस्थितीत आहारासोबतच शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याची माहितीही या भागात जाणून घेणार आहोत.
पचनाशी संबंधित समस्या वारंवार जाणवत असतील तर आहाराकडे कसे लक्ष द्यावे आणि दैनंदिन जीवनात कोणत्या सवयी उपयुक्त ठरू शकतात, याबाबत सविस्तर माहिती पाहा **‘Apla Diet’**च्या या खास भागात.
आपलं नाशिक | आपला आवाज


