मुंबई : धुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ७२५ एकर जमीन एमआयडीसी उभारण्यासाठी मंजूर करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाने यासंदर्भात निर्णय घेतल्याची माहिती मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
महसूल विभागाकडून ही जमीन कृषी दराने एमआयडीसीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या उद्योगविषयक योजनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रक्रियेसंदर्भात ३१ ऑक्टोबरपूर्वी शासन निर्णय काढण्याची विनंती करण्यात आली आहे. आमदार अनुपभाई अग्रवाल यांनी या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. धुळे जिल्ह्यात औद्योगिक विकासाला गती मिळण्याच्या दृष्टीने या निर्णयाकडे पाहिले जात आहे.


