नाशिक जिल्ह्यावर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे सावट असून जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळी 9 वाजताच्या आकडेवारीनुसार गंगापूर, दारणा आणि नांदूर मध्यमेश्वर धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गंगापूर धरणातून 2,498 क्यूसेक, दारणा धरणातून 5,408 क्यूसेक तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून सर्वाधिक 9,465 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे गोदावरी आणि दारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
प्रशासनाने नागरिकांना नदीपात्र, पूल आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळण्याचे आवाहन केले असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.


