नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. कुंभमेळ्यादरम्यान तपोवन साधुग्राम, आखाडे, टेंट सिटी आणि गोदावरी घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार असल्याने संभाव्य आगीच्या घटनांचा सामना करण्यासाठी अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर तब्बल ५५.९५ कोटी रुपयांच्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनांच्या खरेदीला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
या खरेदीमध्ये ६ हजार लिटर क्षमतेचे ९ अत्याधुनिक फायर टेंडर्स घेण्यात येणार आहेत. याशिवाय आगीवर उंच ठिकाणाहून नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल ६० मीटर उंचीचा अत्याधुनिक वॉटर टॉवर खरेदी करण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर तात्पुरत्या निवास व्यवस्था, टेंट सिटी, आखाडे आणि इतर ठिकाणी गर्दी होणार असल्याने या अत्याधुनिक वाहनांचा उपयोग महत्त्वाचा ठरणार आहे.
यासोबतच अग्निशमन विभागासाठी मिनी रेस्क्यू टेंडर आणि आवश्यक आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याची तयारी करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिक आणि भाविकांना जलद मदत मिळावी, तसेच आगीवर तातडीने नियंत्रण मिळवता यावे, यासाठी अग्निशमन विभागाचे सक्षमीकरण करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे या खरेदीसाठी केंद्राच्या निधीची प्रतीक्षा न करता सिंहस्थ प्राधिकरणाच्या निधीतून तातडीने तरतूद करण्यात येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीतील हा निर्णय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, या वाहन खरेदीच्या प्रस्तावावरून प्रशासकीय पातळीवरही चर्चा रंगली. बैठकीदरम्यान आयुक्त मनिषा खत्री आणि अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्यात झालेली शाब्दिक चकमक चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे अग्निशमन वाहनांच्या खरेदीसोबतच प्रशासकीय वर्तुळातील या घडामोडींकडेही शहराचे लक्ष लागले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान नाशिकमध्ये देशभरातून लाखो भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. तपोवन साधुग्राम, आखाडे, टेंट सिटी, गोदावरी घाट आणि पार्किंग परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी राहणार असल्याने आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन यंत्रणेची क्षमता वाढवणे अत्यावश्यक मानले जात आहे.
५५.९५ कोटींच्या या खरेदीमुळे नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाला अत्याधुनिक वाहने आणि उपकरणांची साथ


