‘आपलं नाशिक’च्या कार्यालयातील लाडक्या बाप्पाची सकाळची आरती आज आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडली. गणरायाच्या आरतीनिमित्त कार्यालयात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.

 

 

यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी ‘आपलं नाशिक’च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच नाशिक शहरातील विविध मुद्द्यांवर संवाद साधत संबंधित विषयांवर चर्चा केली.