नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी १० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. पावसातील खंड, पिकांचे नुकसान आणि शेतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दुष्काळी परिस्थितीचा शेती आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत असून, आता शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणत्या स्वरूपाची मदत मिळणार, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे कसे होणार आणि प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आर्थिक मदतीसोबतच पिकांचे नुकसान, पुढील हंगामासाठी आवश्यक असलेली मदत, पाणी उपलब्धता आणि शेतीशी संबंधित इतर समस्यांवरही शेतकऱ्यांना ठोस उपाययोजनांची अपेक्षा आहे.

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत? शासनाकडून कोणत्या मदतीची गरज आहे? दुष्काळाचा शेतीवर आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर नेमका काय परिणाम झाला आहे? याच प्रश्नांचा आढावा ‘आपलं नाशिक’चे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या आणि शासनाकडून अपेक्षित मदतीबाबतच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा आपलं नाशिक | आपला आवाज.