नाशिकच्या सुरगाणा नगरपंचायतीच्या शासकीय इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भेगा पडलेल्या आणि जीर्ण अवस्थेतील या इमारतीत अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांचा नियमित वावर सुरू आहे.
इमारतीच्या सद्यस्थितीमुळे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
सुरगाणा परिसरात यापूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याने या इमारतीच्या सुरक्षिततेचा मुद्दा अधिक गंभीर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरपंचायत इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून इमारत धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती आहे.
धोकादायक इमारतीतच शासकीय कामकाज सुरू असल्याने भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
नगरपंचायत कार्यालय सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांची जोखीम कमी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
इमारतीच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन आवश्यक दुरुस्ती किंवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
सुरगाणा नगरपंचायतीच्या धोकादायक इमारतीची नेमकी स्थिती काय आहे? पाहा Apla Nashik चा VIDEO.
नाशिक जिल्हा
ब्रेकिंग
सुरगाणा नगरपंचायत कार्यालयाला भेगा; धोकादायक इमारतीतच कामकाज सुरू
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#सुरगाणा नगरपंचायत
संबंधित बातम्या
नाशिक जिल्हा
‘को जागर्ति?’ म्हणत देवी लक्ष्मी का करते भ्रमण? जाणून घ्या कोजागरीचे महत्त्व! यंदा कोजागरीचा गोडवा महागणार? म्हशीच्या दुधाचे दर वाढणार...
नाशिक जिल्हा
पाण्याअभावी बागलाणच्या शेतकऱ्याचा निर्णय; ११ वर्षांची द्राक्षबाग तोडण्याची वेळ
नाशिक जिल्हा
अनकाई किल्ल्यावर दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा मृत्यू; ग्रामस्थांची मदत
नाशिक जिल्हा
राहुड घाटात ब्रेक फेल झाल्याने ट्रक पलटी; दोन जण गंभीर जखमी, पोलिसांकडून बचावकार्य
नाशिक जिल्हा
सिंहस्थापूर्वीच रामकुंड परिसरात चोरी; नव्याने उभारलेल्या ध्वजस्तंभांवरील पितळी वस्तू लंपास


