नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शहरातील पूरस्थिती अधिक गंभीर बनली आहे. गंगापूर धरणातून सकाळी 13,932 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून NDRF चे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून नदीकाठच्या सखल भागातील 210 हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, गोदाकाठच्या परिसरावर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने आज नाशिक जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून पुढील परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पाऊस अपडेट
ब्रेकिंग
गोदावरीने ओलांडली धोक्याची पातळी;आज यलो अलर्ट | Apla Nashik
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
पाऊस अपडेट
नाशिक जिल्ह्यात पावसाची सरासरी ओलांडली; १४ सप्टेंबरपर्यंत ४५ टक्के अधिक पाऊस !
पाऊस अपडेट
त्र्यंबकेश्वर-दिंडोरीत मुसळधार, इगतपुरीत पावसाचा ब्रेक
पाऊस अपडेट
जायकवाडी धरणातून आज १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; गोदावरीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
पाऊस अपडेट
नाशिक धरणांमधून विसर्ग सुरू; नदीकाठची परिस्थिती नियंत्रणात
पाऊस अपडेट
धोम धरणाचा विसर्ग वाढला; कृष्णेच्या पाण्याने वाईच्या महागणपतींच्या चरणांना स्पर्श, उद्या मंदिर बंद


