मुंबई नाका, नाशिक : नाशिकमध्ये झालेल्या पावसानंतर मुंबई नाका परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

पाण्यातून मार्ग काढताना अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांची तारांबळ उडाली. काही वाहने पाण्यात बंद पडल्याने परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली.

मुंबई नाका हा नाशिकमधील महत्त्वाचा आणि गजबजलेला परिसर असून दरवर्षी पावसाळ्यात येथे पाणी साचत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते. योग्य निचरा व्यवस्था नसल्यामुळे ही समस्या कायम असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

नालेसफाई आणि पाणी निचऱ्याच्या कामांकडे प्रशासनाने अधिक लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.